शिर्डी साई मंदिर (shirdi sai temple) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
शिर्डी साई मंदिर कार्य
साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.
भक्त समुदाय
साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे
शिर्डी साई मंदिर इतिहास
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.
शिर्डीच्या मंदिराची श्रीमंती
आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.
शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़.
शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़
याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.
दळणवळण संपादन करा
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे.शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ कि.मी. आहे