शनि प्रदोष व्रत कथा Shani Pradosh Vrat katha

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला  येते. हे व्रत महादेवाला समर्पित आहे. असे म्हणतात की समुद्र मंथनच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले तो दिवस त्रयोदशी होता. त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली. यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवाला समर्पित केले जाऊ लागले. आजही या व्रतामध्ये प्रदोष कालात महादेवाची पूजा केली जाते. प्रदोषाचे महत्त्वही दिवसानुसार बदलते.