You are currently viewing रथसप्तमी कथा Rathasaptami katha

रथसप्तमी कथा Rathasaptami katha

रथसप्तमी कथाहा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो[७] अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. सात घोडे (उच्चैःश्रवा) आणि सारथी अरुण (गरूडाचा मोठा भाऊ) यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.

या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.

रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे. 

सूर्यादेवाची १२ नावे घेऊन १२ सूर्यनमस्कार घालावे. 

पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. 

त्याला तांबडी फुले वाहावीत. 

सूर्याला प्रार्थना करून आदित्यहृदयस्तोत्रम्, सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम्, यांपैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे. 

खिरपूरीचा नैवेद्य दाखवावा. 

सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात. या बारा राशींचे प्रतिक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. 

अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.